प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
२९ ऑगस्ट मंगळवार रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथील विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित "ISRO च्या वैज्ञानिकांना सामूहिक सलामी" या कार्यक्रमात, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेतील वैज्ञानिकांनी चंद्रयान अभियान यशस्वी करून दाखविल्यामुळे सर्व जगभर त्यांचे कौतुक होत आहे.
भारताचा नागरिक या नात्याने या गोष्टीचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा आणि आपण जरी प्रत्यक्ष त्या अभियानात सामील नसलो तरी इस्रोतील वैज्ञानिकांच्या या दैदिप्यमान कामगिरीचा सर्व भारतीयांना खूप अभिमान आहे, अश्या प्रकारे राष्ट्रहितासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती असो किंवा संस्थां असो त्या सर्वांचा सामुहिक गौरव हा झालाच पाहिजे असे मत विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे यांनी व्यक्त केले.
या वेळी इस्रोच्या वैज्ञानिकांच्या कामगिरी बद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी सर्वांनी सामूहिक सलामी दिली व राष्ट्रगीत गावून त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.आय.भंगाळे होते, तसेच उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे तसेच सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन भिडे यांनी व आभार डॉ.एस.एल. बिऱ्हाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कल्पना पाटील, डॉ. राकेश तळेले, डॉ. हरीश तळेले, डॉ. आय. पी. ठाकूर, डॉ.पंकज सोनवणे, डॉ. ए. के. पाटील, धनु माळी, शेखर महाजन, सिद्धार्थ तायडे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment