निंभोरा प्रतिनिधी
निंभोरा बु.|| ता. रावेर येथील बलवाडी रस्त्या लगत रेल्वे गेटला लागून असलेल्या शेती शिवारात निंभोरा गावाचे सांडपाणी साचत असते यामुळे येथील शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विहिरीतील पंप पाण्यात बुडून नुकसान होत आहे.
याबाबत वेळोवेळी निंभोरा बु.|| ग्रामपंचायतला व संबंधितांकडे कडे समस्येबाबत हा प्रश्न सुटावा म्हणून शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली होती परंतु याकडे ग्रामपंचायतीने व संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी ञस्त होऊन दि. ५, शनिवार रोजी लाक्षणिक उपोषण निंभोरा बु. ग्रामपंचायत समोर केले होते.
या उपोषणाला मंडळ अधिकारी दिपक गवई, तलाठी समीर तडवी, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, सरपंच सचिन महाले, ग्रामपंचायत सदस्य डिगंबर चौधरी, सतीश पाटील व इतर सदस्यांनी गावातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिकांनी शेतकऱ्यांना भेट दिली होती.
यावेळी मंडळ अधिकारी यांनी व तलाठी, ग्रामसेवक तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व याबाबतचा पाठपुरावा तहसीलदार व प्रांताधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उपोषणास बसलेले शेतकरी मुरलीधर कोळी, सुधीर मोरे, सुभाष चौधरी, दीपक मोरे, दीपक कोंडे, सुधाकर भोगे, प्रशांत काठोके, हेमंत भंगाळे यासह शेतकऱ्यांना दिल्याने उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यानी उपोषण मागे घेतले.
उपोषणास्थळी गावातील शेतकरी, राजकीय, सामाजिक व सहकार यासह विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी भेटी दिल्या होत्या.
यावेळी शेतकऱ्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न लवकर न सुटल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषण करते मुरलीधर कोळी सुधीर मोरे, दिपक कोंडे, सुभाष चौधरी व आदी शेतकऱ्यांनी दिला.
याप्रसंगी निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे स.पो.नि. गणेश धुमाळ, स्वप्निल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
إرسال تعليق