फैजपूर प्रतिनिधी
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फैजपुर येथे भव्य रॅली चे आयोजन करून आदिवासी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी तडवी भिल्ल बहुउद्देशीय सभागृह या ठिकाणी करण्यात आले होते.
याप्रसंगी सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फैजपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक मसुद्दीन शेख, मोहन लोखंडे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे यंदाही फैजपुर येथे आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. आदिवासी तडवी समाज बांधवांतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तडवी सभागृहापासून ते फैजपुर नगरपरिषद पर्यंत पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात आदिवासी संस्कृतीचे जिवंत नृत्य वाजत गाजत आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन, रॅलीमध्ये तिरंगा झेंडा घेऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
रॅलीचा मार्ग तडवी बहुउद्देशीय हॉल ते न्हावी दरवाजा, खुशाल भाऊ रोड, सुभाष चौक, छत्री चौक मार्ग, खंडेराववाडी गेट, जुनी म्युनिसिपल हायस्कूल रोड येथुन खडेराववाडी मार्ग, न्हावी दरवाजा गेट, तडवी वाडा दर्ग्याजवळ समारोप झाला.
यावेळी राजु तडवी इंजिनियर, इकबाल इस्माईल, जाकीर रुबाब, राजु नजीर पत्रकार, माजी नगर सेवक रशीद नशिर, समीर गंभीर पत्रकार, इस्माईल हाजी बाबु, जलील अरमान, फत्तु बाबु, शरीफ भासा, रशीद नजीर, अरमान रज्जाक, नजीर नुरखा, इकबाल उस्मान, मान सुलैमान बाबु, फिरोज सायबु, रशीद बाबू, महेबुब गंभीर, हकीम अयमत, बुऱ्हान कालु, इसुब भुरेखां, रमजान दिलदार, नबाब मैताब, आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधव बहुसंख्येने रॅलीत उपस्थित होते.
यावेळी फैजपुर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
إرسال تعليق