प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
जळगाव येथे आज दिनाक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक आदिवासी दिन निमित्त कांचन नगर वार्ड क्र. २ अ आदिवासी वार्डचे अनुसूचित जमातीचे नगर सेविका सौ. कांचन ताई सोनवणे यांनी पूजन करून व नारळ फोडून, पेढे वाटप करून अत्यंत आनंदीमय वातावरणात यांचा शुभ हस्ते वार्डातील विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले.
सदरहू कामे मंजूर झाले असून खालील निधीतून जिल्हा नियोजन मनपा निधी, ठक्कर बाप्पा आदिवासी योजना निधी मा. ना. देवेंद्र फडणीस नगर परिसरात नागरी निधी अंतर्गत करण्यात येत आहेत सदरहू योजनांचे सदरहू वार्डासाठी एकूण रु. ५,००,००,०००/- पाच कोटी रु. मा. ना. गिरीषभाऊ महाजन, पालक मंत्री मा. ना. गुलाबभाऊ पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने मंजूर आहेत.
विकास कामाचा उद्घाटन प्रसंगी राजेंद्र कोळी, रवी पाटील, अशोक सोनवणे, रवींद्र सोनवणे, भगवान नन्नवरे, रुपेश सपकाळे, राजकिरण चौधरी, पंकज श्रीखंडे सुकदेव सपकाळे, सुभाष वास्कर, अनिल कोळी, मंगलाबाई सोनवणे, इंदुबाई मराठे, सुंदरबाई सोनवणे, आशा सपकाळे, कविता कोळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment