फैजपूर प्रतिनिधी
स्वराज्य इंग्लिश मेडीयम स्कूल, कळमोदे येथे रक्षाबंधन निमित्त राखी बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी मुलांनी विविध साहित्य वापरून राख्या बनविल्या. या स्पर्धेसाठी मुलांनी आपल्या कल्पनेनुसार खूप सुंदर राख्या बनविल्या.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
या स्पर्धेसाठी कळमोदे गावातील माजी सैनिक सलीम रमजान तडवी CISF (पीएस आय) PSI यांना परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी सलीम तडवी सरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या स्पर्धेत लिखित बोन्डे- प्रथम, तुषारांशु कुवर - द्वितीय, व जानवी फेगडे - तृतीय असे विद्यार्थी विजयी झाले.
परीक्षक सलीम तडवी यांनी विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. तसेच मुलांना यशाने हुरळून जाऊ नये व अपयशाने खचून जाऊ नये. असे मोलाचे मार्गदर्शन केले.
शेवटी शाळेच्या प्राचार्या सौ. एन. एल. पाटील यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
إرسال تعليق