एनपूर प्रतिनिधी
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर पासून पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असताना येलो अलर्ट देखील दिला होता. काल रात्री साधारण आठ वाजेपासून गेले बारा ते पंधरा तास झाले रावेर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नदी, नाले यांना पूरस्थिती निर्माण झाली असून तापी नदीला एनपुर निंबोल रस्त्यावर पूर आला आहे. त्यामुळे एनपुर निंबोल या दोघ गावांचा संपर्क तुटला आहे. आज शनिवार एनपुर गावाचा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने खरीददार तसेच विक्रीदार यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
प्रशासनाने या आधीच तापी नदी काठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच नागरिकांनी नदी तसेच पाणी वाहणाऱ्या पुलावरून ये जा करणे टाळावे. असे आवाहन सुद्धा करण्यात आले होते.
Post a Comment