Khandesh Darpan 24x7

आयुष्यभर निरोगी जीवन जगायचे असेल तर आहारावर नियंत्रित ठेवा: डॉ.विद्या पाटील




प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 





दिनांक 20 सप्टेबर, 2023 युवती सभा अणि विद्यार्थी विकास विभाग द्वारा धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे "युवती सभेचे" उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी मार्गदर्शन केले. 



मुलींच्या आरोग्यासाठी अनेक घटक उपयुक्त असतात, त्यात दैनंदिन आहार खूप महत्वाचा घटक आहे, आयुष्यभर निरोगी जगायचे असेल तर आहारावर नियंत्रण ठेवले पाहिजे, तसेच लग्नात कुंडली  किंवा पत्रिका पाहण्याआधी ब्लड टेस्ट करून ते रिपोर्ट प्रामुख्याने पाहिले पाहिजे असे सांगितले. 






तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे यांनी सांगितले की स्त्रियांना अनेक प्रसंगातून रक्तस्त्रावसारख्या भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागते म्हणुन मुलींनी प्रामुख्याने रक्त वाढीसाठी असलेले घटक अणि खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजेत.



प्रसंगी  लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व  दीप प्रज्वलन करून युवती सभेचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर युवती सभा प्रमुख डॉ. जयश्री पाटील यांनी प्रास्तविक केले तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. 




सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




सूत्र संचालन कुमारी नेहा पाटील व  आभार साक्षी दोडके या युवतींनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कल्पना पाटील, डॉ. सविता वाघमारे, डॉ. सीमा बारी, डॉ. शुभांगी पाटील, प्रा. पल्लवी भंगाळे, डॉ. सरला तडवी, प्रा. प्राजक्ता कुरकुरे, चेतना नेहते, आदिती ढाके , कन्हैया चौधरी  यांनी परिश्रम घेतले.






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा






Post a Comment

أحدث أقدم