प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताह उत्साहात संपन्न झाला. १४ सप्टेंबर "हिंदी दिवस" निमित्ताने हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सप्ताह भर विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यात दि. 15/09/२०23 रोजी रांगोळी व मेहंदी स्पर्धा,
दि. २०/०९/२०२३ रोजी निबंधलेखन व सामान्य ज्ञान स्पर्धा,
दि. २१/०९/२०२३ रोजी वकृत्व स्पर्धा
अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षक डॉ. सविता वाघमारे व डॉ. सरला तडवी,
मेहंदी स्पर्धेचे परीक्षक डॉ. राजश्री नेमाडे व डॉ. जयश्री पाटील,
वकृत्व स्पर्धेसाठी परीक्षक डॉ. मारोती जाधव व प्रा निखिल वायकोळे यांनी केले.
रांगोळी, मेहंदी, निबंधलेखन, वकृत्व व सामान्य ज्ञान इ. स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व स्पर्धांमध्ये कनिष्ठ व वरीष्ठ असे दोन्ही गटासाठी बक्षीस देऊन विद्यार्थांचा गौरव करण्यात आला.
प्रसंगी समारोप समारंभाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रविंद्र खरे, महिला महाविद्यालय डोंगरकठोरा यांनी "हिंदी भाषा के बढ़ते कदम" या विषयावर मार्गदर्शन करताना संगीतले की, हिंदी भाषेचे सम्यक आणि सखोल ज्ञान प्राप्त केल्यावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, त्या प्राप्त करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे हिंदी भाषेचा अभ्यास केला पाहिजे व भाषेवर प्रभुत्व मिळविले पाहिजे, असे सांगत जगभरात आता हिंदीचे महत्त्व वाढत चालले आहे असे सांगितले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. अनिल भंगाळे यांनी भूषविले. प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रो. कल्पना पाटील केले. कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, डॉ. ईश्वर ठाकूर, डॉ. विजय सोनजे, डॉ. सतीश पाटील, प्रा. अर्चना वराडे, डॉ. मारोती जाधव, डॉ. राजेंद्र राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धेत:
कनिष्ठ गटात :
प्रथम - गायत्री शशिकांत चौधरी,
वरीष्ठ गटात :
प्रथम - चैताली तुळशीराम चौधरी,
द्वितीय-नेहा योगेश पाटील,
तृतीय- छाया किशोर शिराळे व
उत्तेजनार्थ - पूर्वा शरद तायडे.
मेहंदी स्पर्धेत:
कनिष्ठ गटात
प्रथम- प्रेरणा सुरेश माखिजा,
द्वितीय-अपेक्षा किशोर लोखंडे,
तृतीय-गायत्री शशिकांत चौधरी
वरीष्ठ गटात :
प्रथम- मेहेक मनोहर दोधानी,
द्वितीय- भाग्यश्री मनोहर महाजन,
तृतीय- ललिता किशोर पाटील व
उत्तेजनार्थ - वंशिता अनिल डी.
वकृत्व स्पर्धेत :
कनिष्ठ गटात :
कशीश दिपक गलवाडे व
उत्तेजनार्थ - आर्यन कोळी,
वरीष्ठ गटात :
प्रथम- नयना रविंद्र पाटील,
द्वितीय - छाया किशोर शिरसाळे,
तृतीय - माधुरी मुकेश भरणे व
उत्तेजनार्थ - योगेश लक्ष्मण सैंदाणे.
निबंधलेखन स्पर्धेत :
कनिष्ठ गटात :
प्रथम - भाग्यश्री शशिकांत चौधरी,
द्वितीय - प्रेरणा सुरेश माखिजा,
तृतीय - श्रेया श्रीनिवास भोसले,
वरीष्ठ गटात :
प्रथम - पौर्णिमा चंद्रकांत कोळी,
द्वितीय - रुबिना नुरखां तडवी,
तृतीय - मेहेक मनोहर दोधानी व
उत्तेजनार्थ - लविना प्रमोद ब-हाटे.
सामान्य ज्ञान स्पर्धेत
कनिष्ठ गटात:
प्रथम - आर्यन किशोर कोळी,
द्वितीय - पुजा सुनिल सोनवणे,
तृतीय - गौरवी मिलिंद महाजन,
वरीष्ठ गटात :
प्रथम - सागर प्रकाश भालेराव,
द्वितीय - माधुरी मुकेश भरणे,
तृतीय - जितेंद्र रघुनाथ सोनवणे
या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा कोळी व आभार श्रद्धा नाथजोगी या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले, शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post a Comment