प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर सावदा येथे साईबाबा मंदिराजवळ महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात होत असतात त्यात कित्येक नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने सावदा येथील पत्रकारांनी शनिवारी दिनांक २३ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन पुकारले तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आंदोलन स्थळी बोलवण्यात यावे अशी भूमिका घेतली रा.म.प्र. चे अधिकारी आंदोलन स्थळी पोहचल्या नंतर उपस्थित नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका मांडली व अधिकाऱ्यांकडून तात्काळ काम सुरू करण्यात आले.
यावेळी पत्रकारांच्या या सामाजिक आंदोलनाला नागरिकांकडून मोठा व्यापक पाठिंबा मिळाला. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, कोठारी शास्त्री भक्ती किशोर दास, आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भाजपा कार्यकर्ते यांचे कडून या रस्ता दुरुस्तीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तर सावदा शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक तरुणांकडूनही आंदोलनाला मोठा पाठिंबा होता.
यावेळी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट पत्रकार संघाचे अध्यक्ष शामकांत पाटील, प्रवीण पाटील, कमलाकर पाटील, पंकज पाटील, राजेंद्र भारंबे, राजेंद्र चौधरी, साजिद शेख, आत्माराम तायडे, जितेंद्र कुलकर्णी, राजू दिपके, प्रदीप कुलकर्णी, राजेश चौधरी (राज सर), योगेश सैतवाल, लाला कोष्टी, रवींद्र हिवंरकर, राजेश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील पत्रकार उपस्थित होते. महसूल विभागाकडून नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे हे आंदोलन स्थळी उपस्थित होते.
आंदोलना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक शांताराम पाटील, गुप्तवार्ता विभाग देवेंद्र पाटील, यशवंत टहाकळे यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
दिनांक २५ सप्टेबर, २०२३ सोमवार रोजी बैठक -
आंदोलना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग संदर्भात उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, पत्रकार, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांची संयुक्त बैठक दिनांक २५ रोजी सावदा येथे विश्रामगृहावर आयोजित केली जाणार असल्याची माहिती रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.
या दरम्यान भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर चौधरी यांनी मोबाईल वरून ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचेशी चर्चा करून दिली.
إرسال تعليق