प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील इंदिरा गांधी चौक भागातील चौधरी मेडिकल चे संचालक अमोल चौधरी यांनी नुकताच औषध निर्माण शास्त्र दिनानिमित्त कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील माजी व्यवस्थापन सदस्य तसेच फार्मसी कॉलेज चे माजी प्राचार्य डॉ. विजय चौधरी, इंस्टीट्युट ऑफ फार्मसी फैजपूर चे प्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज इन केमेस्ट्री चे डॉ. राजेश चौधरी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात ऑनलाइन औषधी का घेऊन नये. त्यापासून होणारे नुकसान काय आहे. यावर मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच दुकानातून औषधी घेतल्याने काय काय फायदे होतात ते सुद्धा समजावून सांगितले. संपत्तीचा बँक बेलंस महत्वाचा नाही तर आरोग्याचा बँक बेलंस चांगला असला तर आपल्या आयुष्याला अर्थ आहे हे पटवून दिले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद चौधरी, माजी नगरसेवक फिरोज खान पठान, देवेंद्र धांडे (भाऊ धांडे), मुरलीधर चौधरी सर, सुनील पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. वसीम खान, डॉ. तुषार चौधरी, डॉ. एल. एस. पाटील, सुहास ठोमरे सर, पुरुषोत्तम चौधरी सर, विजय चौधरी, शिवाजी चौधरी, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल चौधरी व कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर च्या सहाय्यक प्रोफेसर अपेक्षा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चैतन्य मित्र मंडळ व गांधी चौक मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
Post a Comment