प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा (ता. रावेर) शहरात मोकाट व आजाराने ग्रस्त असलेल्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढलेली असून, यांच्या मध्ये शरीरावर मोठ मोठ्या जखमा असलेले पिसाळलेले कुत्रे सुद्धा अधीक आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
गेल्या ३ वर्षात या कुत्र्यांकडून शहरातील अनेक लहान मुलांसह महीला, पुरुषांना रात्रीबेरात्री चावा घेवून दुखापत केल्याच्या घटना घडलेल्या आहे. तसेच शहरात लाईटची सुविधा पासुन वंचित नविन प्लाट भागात हे कुत्रे झूंडपात रात्रीच्यावेळी शेळ्यांवर हल्ला चढवून फसगत करतात यामुळे शेळीपालन करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. असे असताना आजतागायत पालिका प्रशासनाने या आजारी व जखमी कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने शहरातील जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे.
तरी सदरील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ कायमचा बंदोबस्त लावण्यात यावा व मोकाट कुत्रे पकडण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून मोकळे न होता पालिका प्रशासनाने हे काम थेट स्थानिक पातळीवरील संबंधितांना द्यावे. अशी मागणी सावदा येथील सोहेल खान फाउंडेशनच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी समाजसेवक तथा फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल खान व पदाधिकारी फरीद शेख, युसूफ शाह, शेख नीसार अहेमद, कलीम जनाब इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment