प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात सन २०२३-२४ साठी प्रथम सत्राची शिक्षक पालक सभा नुकतीच पार पडली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो. तसेच महाविद्यालयीन शिस्त, प्रवेश परीक्षा व सराव परीक्षा यासंदर्भात प्राचार्यांनी मार्गदर्शन केले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
पालकांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. मुलींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी स्थापन केलेल्या समित्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची पालकांना माहिती देण्यात आली.
सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. जयश्री सरोदे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. शेवटी आभार प्रा. दिलीप बोदडे यांनी केले.
Post a Comment