Khandesh Darpan 24x7

कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस पिकाची वाढ मुल्य साखळी विकास योजनेअंतर्गत शेती शाळाचे आयोजन



रावेर प्रतिनिधी


थोरगव्हाण ता. रावेर येथे महाराष्ट्र शासन रावेर कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन २०२३ -२४ अंतर्गत उत्पादकता वाढीवर कापूस पिकाची शेती शाळा वर्गाचे आयोजन गणपत झिपरू चौधरी यांच्या शेतात करण्यात आले.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


शेती शाळेत उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत कृषी सहाय्यक- राजेंद्र कोंडे यांनी आय.सी.एम. टाळी वाजवून केले. कार्यक्रमाची रूपरेषा बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक- सचिन गायकवाड यांनी कामगंध सापळे, उपयोग व व्यवस्थापन तसेच रस शोषणाऱ्या किडी, गुलाबी बोंड अळी व व्यवस्थापन याबद्दल कापूस पिकाची निरीक्षणे घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. 


उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन शेती शाळेत करण्यात आले. कापुस पिकाचे उत्पादन वाढीवर मार्गदर्शन सञ आटोपल्या नंतर शेतकऱ्यांना अल्पोहार देण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून पुढील वर्गास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी सहाय्यक- राजेंद्र कोंडे यांनी केले. 


शेती शाळा वर्गास परिसरातील शेतकरी मंडळींनी प्रत्यक्ष शेतात हजर राहून उत्तम प्रतिसाद दिला.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post