प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
५ सप्टेंबर शिक्षकदिन भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. तसा तो सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिर येथे देखील मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
या दिवशी शाळेतील विद्यार्थिनीनी स्वतः शिक्षकाची भूमिका पार पाडल्या. स्वतः शिक्षक बनून शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. या वेळी इयत्ता १० वी ची प्राची बऱ्हाटे मुख्याध्यापिका म्हणून तर हेमलता सरोदे व कोमल भंगाळे पर्यवेक्षिका म्हणून कामकाज पहिले.
या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या मध्ये विद्यालयातील विद्यार्थीनिंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती बडगे, वैष्णवी महाजन, दिक्षा चौधरी, प्रीती परदेशी यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी शिक्षकांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे पर्यवेक्षक पी. जी. भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला. तर विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करताना सर्व शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
वर्गात शिकवीत असलेल्या विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक आणि शाळेतील सर्व शिक्षकांना सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, हेमांगी चौधरी, माझी नगरसेविका लिना चौधरी, सावद्यातील व्यावसायिक योगेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगरसेविका रेखा वानखेडे, निलगिरी कॉम्प्युटर चे संचालक संतोष परदेशी यांनी शुभेच्छा दिल्या.
आभार प्रदर्शन रोहिणी चौधरी ,पायल ठोसरे, पूर्वा नेमाडे यांनी केले.
या वेळी जी. बी. तडवी, राजेश जावळे, संजय भोई, संजीव झांबरे, निलेश चौधरी, स्वप्नील वंजारी, निर्मला बेंडाळे, चारुलता चौधरी, मोहिनी राणे, राधाराणी टोके, सुलभा मेढे, कल्पना देवकर, सुभेदार तडवी व सचिन सकळकळे उपस्थित होते.
إرسال تعليق