प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
निंभोरा येथे लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण आयोजन डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव येथील कृषीदूत यश दाते, मुकेश चौधरी, नरेंद्र जाधव, गुणवंत चौधरी, सचिन लोखंडे, निलेश जाधव यांच्याकडून करण्यात आले.
यावेळी पशु चिकित्सक डॉ. राहुल महाजन (पशुैद्यकीय ) यांचे मार्गदर्शन लाभले. तेथे वैभव महाजन, दत्तात्रय नेहेते, सुभाष नेहेते, रोशन भंगाळे, अमित भंगाळे, दशरथ नेहेते, प्रमोद नेहेते, दिगंबर नेहेते, उपस्थित होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कशामुळे पसरतो लम्पी त्वचा रोग?
लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग किटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो.
काय आहेत या आजाराची लक्षणे?
लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. या अशी लक्षणे दिसून येतात. या आजारामुळे जनावरे दगावतात.
काय काळजी घ्याल?
- गोठ्यात माशा, डास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- गोठ्यात स्वच्छता राखावी.
- निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे.
- बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
Post a Comment