Khandesh Darpan 24x7

श्री आ. ग॔. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा. येथे नगरपरिषद सावदा द्वारा, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न.




प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


आज दिनांक १५ सप्टेबर, २०२३ या दिवशी श्री. आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे मुख्याधिकारी किशोर चव्हाण  व  नगरपालिकेचा स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये श्री आ. गं. हायस्कूल सावदा चे कलाध्यापक  नंदकिशोर पाटील (नंदू सर)  यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ही शाडूच्या माती पासून कशी बनवावी व पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे आताच्या काळामध्ये किती महत्त्व आहे. तसेच  प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंग यापासून पर्यावरणाची होणारी हानी किती घातक आहे हे विशद केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष गणपती बाप्पा कसा तयार करतात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.



फोटो स्लाईड होत आहेत



या प्रात्यक्षिकानंतर श्री आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा चे विद्यार्थी व विद्यार्थिनी, नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन गणपतीच्या मूर्तीचे प्रशिक्षण घेऊन स्वतः गणेश मूर्ती तयार करून अतिशय सुंदररीत्या आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.


 

व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


याप्रसंगी रावेर तालुक्याचे तहसीलदार बंडू कापसे यांनी या कार्यशाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती किती आवश्यक आहे व आपण हा उपक्रम अतिशय उत्साहाने राबवत आहात म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे कलाध्यापक नंदू पाटील यांनी कौतुक केले.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


याप्रसंगी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, आणि पदाधिकारी सचिन चोळके, अरूणा चौधरी, संजय महाजन सर, सौ. भारती महाजन मॅडम,  सौ. प्रणाली काटे मॅडम, सौ. निर्मला बेंडाळे मॅडम, वाय. एन. पाटील, दिलीप काळे उपस्थित होते.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



वरील एल्बम चा टीझर पाहण्यासाठी यावर क्लिक करा. आणि मोक्षदा म्युजिक का सबस्क्रइब करा.






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post