प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे "मेरी माटी, मेरा देश" कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, प्रा. डॉ. व्ही. सी. बोरोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा. प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गावाला प्राप्त झालेला ऐतिहासिक वारसा थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या नेतृत्वात याच भूमीवर ग्रामीण काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले तेव्हा महात्मा गांधीजींबरोबर अनेक थोर स्वातंत्र्य सेनानी व राष्ट्रीय नेत्यांनी या परिसराला आपल्या चरणाने पावन केले व स्वातंत्र्याची ज्योत मनामनात निर्माण केली.
परिसरातील अथवा आपण राहत असलेल्या ठिकाणाहून माती आणून महाविद्यालयातील अमृतकलशामध्ये टाकून आपल्या मातृभूमीच्या परिसरातील मातीला सन्मानित करावे, असे अवाहन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना सेल्फी काढून विद्यापीठाने दिलेल्या लिंक वरती अपलोड कसे करावे या बाबत डेमो देवून माहिती दिली. व सदर आयोजन मागील भूमिका मांडली.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सेवा योजना विभाग सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी सहा. महीला कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी भंगाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, .कार्यालयीन कर्मचारी व रा. से. यो. सर्व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी अमृत कलशामध्ये माती टाकून सेल्फी काढून अपलोड करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
Post a Comment