प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरात घनकचरा अधिनियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत नगरविकास विभाग यांचे कडून कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार आज दिनांक २५ ऑक्टोंबर, २०२३ पासून सावदा शहरात निर्माण होणारा घरगुती कचरा १००% वर्गीकरण करणे त्याबाबत शहरात जनजागृती आणि प्रत्यक्ष १००% वर्गीकरण कश्याप्रकारे करायचे याचे प्रात्यक्षिक उदाहरण देणे कामी सुरु केलेले आहे.
यामध्ये दिलेल्या भागातील घंटागाडी सोबत आठवड्यातून एक दिवस सकाळी फिरून नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकृत कसा करायचा याची माहिती देऊन सदर नागरिकांना माहिती देत असतानाचे फोटो सावदा नगरपरिषद Whatsapp Group टाकण्याचे आदेश सुद्धा दिली आहेत.
यात सावदा पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच सदर कामाकडे दुर्लक्ष्य केल्याचे निदर्शनात आल्यास आपणावर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ अनुसार कलम ७९ (२) अन्वये शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रम सोमवार ते शनिवार रविवार वगळता रोज राबविण्यात येणार असून यासाठी दररोज वेगवेगळ्या अधिकारी व कर्मचारी यांना समावेश करण्यात आलेला आहे.
यामध्ये - घंटागाडी मुकादम सोपान घावट, विरू आदिवाल हे असतील तर..
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
सोमवार - विशाल पाटील (लेखापाल), विमलेश जैन (रोखपाल), धीरज बनसोडे (संगणक तंत्रज्ञ), चंद्रकांत धांडे (शिपाई)
मंगळवार - सचिन चोळके (कार्यालय अधीक्षक), सतीश पाटील (वरिष्ठ लिपिक), मनोज चौधरी (लिपिक), संदीप वाणी (शिपाई)
बुधवार - भारती पाटील (अंतर्गत लेखापरीक्षक), अरुणा चौधरी (शहर समन्वयक), विनय खक्के (CLTC), हिरामण पाटील (शिपाई)
गुरुवार - जितेश पाटील (न.प.अभियंता यांत्रिकी), अविनाश पाटील (तारतंत्री), संदीप पाटील (NULM), महेश इंगळे (समुदाय संघटन)
शुक्रवार - चेतन पाटील (कर निरीक्षक), बबन तडवी (लिपीक), कार्तिक ढाके (लिपीक), राजेंद्र मोरे (शिपाई)
शनिवार - अविनाश गवळे (स्थापत्य अभियंता), हमीद तडवी (लिपीक), विश्वास साळी (लिपीक), रामा बँडवाल (मुकादम), भागवत घोगले (प्र. मुकादम)
या प्रमाणे समावेश करण्यात आलेला असून आता प्रतीक्षा मात्र सावदा शहर सुंदर शहरा ची आहे.
إرسال تعليق