Khandesh Darpan 24x7

धनाजी नाना महाविद्यालयात एन.डी.एल.आय. वर वेबिनार - असंख्य विद्यार्थ्यांनी घेतला लाभ




प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया क्लबने  (NDLI CLub) दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी वापरकर्ता-जागरूकता वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या आभासी कार्यक्रमात महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे सचिव तथा महाविद्यालयाचे ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांच्या प्रास्ताविकाने झाली. एन.डी.एल.आय. सारख्या डिजिटल लायब्ररींचे महत्व अधोरेखित केले. भौगोलिक किंवा आर्थिक अडथळ्यांची पर्वा न करता सर्वांसाठी ज्ञान सुलभ करण्याच्या एन.डी.एल.आय.च्या ध्येयावर त्यांनी भर दिला.







या कार्यक्रमात प्रमुख वक्ते राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर, सांगली येथील ग्रंथपाल  विश्वास हासे यांनी डिजिटल शिक्षणाची उत्क्रांती आणि एन.डी.एल.आय. डिजिटल संसाधनांचा विस्तृत संग्रहाची माहिती  देऊन, लाखो लोकांसाठी शिकण्याचे नवीन दरवाजे कसे उघडून बदल घडवून आणत आहे याचा आढावा घेतला.  



एन.डी.एल.आय. कौशल्य विकासासाठी एक मौल्यवान साधन म्हणून कसे कार्य करते याबद्दल माहिती दिली. एन.डी.एल.आय. मधील दुर्मिळ आणि अद्वितीय सामग्रीच्या विशाल भांडारावर चर्चा केली की, जो संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक खजिना आहे. माहिती संसाधने प्रभावीपणे कशी शोधायची याची माहिती सांगितली.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. हरीश नेमाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागी विद्यार्थी, वक्ते आणि आयोजकांचे आभार मानले. विद्यार्थ्याना शिक्षणात एन.डी.एल.आय. चा वापर  करण्यासाठी एन.डी.एल.आय. च्या अटल वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.





कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ. ताराचंद सावसाकडे यांनी केले. वेबिनारच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, डॉ. व्ही. सी. बोरोले यांनी मार्गदर्शन केले तसेच उमाकांत पाटील,  सहर्ष चौधरी, सुरेखा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post