प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील मराठी विषयाच्या सहाय्यक प्रा. उन्नती संजय चौधरी यांनी लिहिलेला 'साहित्य आणि समाजशास्त्रीय संशोधन' हा ग्रंथ प्रकाशित झाला.
त्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्ष एम. ए. मराठीचा अभ्यासक्रम आणि पीएच. डी. कोर्स वर्कसाठी, मानवविद्या शाखेतील संशोधन पद्धती या दोन्ही विषयाच्या अध्ययनातून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे.
प्रशांत बुक हाऊस, जळगाव यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध केला असून विद्यार्थी व संशोधक, अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. डॉ. उन्नती संजय चौधरी यांना ग्रंथ लेखन आणि मांडणी साठी महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.मनोहर सुरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
त्यांच्या लेखनात असलेल्या नावीन्यपूर्ण माहिती बद्दल तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संस्थेचे, अध्यक्ष शिरीष चौधरी, लीलाधर चौधरी, संजय चौधरी, संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment