कार्यक्रमाला देशभरातून हजारोच्या संख्येने लाभणार संताची उपस्थिती....
प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू व साधनदाता सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या असीम कृपाप्रसादाने कै. पू.प.म. आचार्य श्री. मोठे मानेकर बाबा व कै.प.पू.प.म. श्री. गुर्जरबाबा शास्त्री या द्वय आचार्याच्या प्रसन्नतेने प.पू.त. मीराबाईजी शेवलीकर, सारोळा यांच्या सानिध्यात ब्रम्हविद्येचे धडे गिरवलेली श्री. पाराजी संताराम मिसाळ, धोंडराई जि. बिड यांची सुकन्या धर्मकुमारी अपेक्षा उर्फ ताऊ ही आपल्या स्वइच्छेने त अलकाताई मानेकर यांना निमित्त करून संन्यास धर्मात प्रवेश करीत आहे.
तत्प्रसंगी श्रीपंचावतार उपहार व अपूर्व भेटकाळ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मंगलमय प्रसंगी पंथीय जेष्ठ श्रेष्ठ आचार्य, महंत संतगण, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी आपण ही सहकुटूंब, सहपरिवारे उपस्थित राहून संतदर्शन, ज्ञानश्रवण व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सावदा येथिल श्री दत्त मंदिराचे मठाधिपती आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे कार्यस्थळ कुलसूमबाई मंगल कार्यालय, सावदा हे राहील व आयोजक म मानेकर शास्त्री, सावदा म. कापुस्तळणीकर बाबा, फलटण, म. उध्दवराज अण्णा मराठे, बांबोरी, मानेकर प्रतिष्ठेच्या सर्व शिष्यगाद्या समस्त मानेकर तथा पारिमांडत्य परिवार त अलकाबाई मानेकर तथा म.श्री.कृष्णराजबाबा गुर्जर ,पांचाळेश्वर, सावदा ग्रामस्थ तथा पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळी हे आहेत.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार
दि. ०४/११/२०२३ शनिवार रोजी
सकाळी ६ वाजतां - श्रीमुर्तीस मंगलस्नान, अभिषेक,
सकाळी ७ वाजतां - श्रीमद् भगवतगीता पारायण,
सकाळी ११ वा. - श्री पंचावतार उपहाराचे यजमान श्री. डॉ. कुशल चुनीलाल अच्युत व अच्युत परिवारातर्फे श्री दत्त मंदीर संस्थान, सावदा येथे संपन्न होणार आहे.
दुपारी ४ वा. - भव्य शोभायात्रा,
रात्री ८ वा. - भजन संकीर्तन
दि. ०५/११/२०२३ रविवार रोजी ,
प्रातःकाळी श्री दत्तात्रेय प्रभूंच्या पवित्र विशेषास मंगलस्नान अभिषेक,
सकाळी ७.०० वा. - श्रीमद्भगवतगीता पारायण,
सकाळी ८.०० वा. - भेटकाळ,
सकाळी ८.३० वा. - धर्मध्वजारोहन धर्मसभा, स्वागत,
सकाळी ९.०० वा. - दिप्रज्वलन, प्रास्ताविक
सकाळी ११.०० वा. - संन्यास दिक्षा विधी अध्यक्षीय विचार
महाप्रसाद दुपारी १ ते ३ वा.
हजारोच्या संख्येने संताची उपस्थिती
आचार्य बिडकर बाबा, आचार्य खामणेकर बाबा, आचार्य लासुरकर बाबा, आचार्य कारंजेकर बाबा, आचार्य दर्यापूरकर बाबा, आचार्य विद्वांस बाबा, आचार्य यक्षदेव बाबा, आचार्य शेवलीकर बाबा, आचार्य हलाशिकर बाबा, आचार्य राहेरकर बाबा, आचार्य सातारकर बाबा, आचार्य कोठी बाबा, आचार्य राजधर बाबा, आचार्य सुकेनेकर बाबा, महामंडलेश्वर सत्पंथाचार्य श्री जनार्दन हरीजी महाराज, आचार्य बाभुळगाव कर बाबा, आचार्य मराठे बाबा, आचार्य संतराज बाबा जम्मू, मुरारमल बाबा फगवाडा, कान्हेराज बाबा दिल्ली, सागर दादा अमृतसर, माधे राज बाबा खतोली, यांची उपस्थिति लाभणार आहे.
Post a Comment