Khandesh Darpan 24x7

निंभोरा येथे ग्रामदेवता "रेणुका माता" व "सप्तशृंगी माता" मंदिरात भाविकांची गर्दी



निंभोरा प्रतिनिधी


निंभोरा बु. ता. रावेर येथील ग्रामदेवता रेणुका माता चे मंदिरात व सप्तशृंगी माता मंदिरात दुर्गा उत्सवात निमित्त प्रथम दिनापासून दररोज गावातील व परिसरातील हजारो नागरिक तसेच  बालगोपाल मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत असतात.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



दुर्गा उत्सवात सतत नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी गावातील भाविकांच्या हस्ते आरती तथा पूजा करण्यात येते. मुकेश जोशी तसेच रेणुका माता मंदिर समितीचे पदाधिकारी व भाविक मंदिराचा कार्यभाग पाहत असतात.


दररोज सकाळी, संध्याकाळी हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. दुर्गा उत्सवानिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या समोरील भागात सभा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर गावातील सप्तशृंगी मातेच्या दोघ मंदिरात दुर्गा सप्तशतीचे पाठ घेण्यात येतात. मातेच्या दर्शनासाठी ही मोठ्या प्रमाणात भाविक येतात.




रोज संध्याकाळी युवक युती मोठ्या प्रमाणात गरबा दांडिया खेळतात. तसेच सकाळी देवीच्या मंदिरात देवी पाठाचे सामूहिक वाचन महिला भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم