प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर ता. यावल येथे सुप्रसिद्ध कवी तथा शिक्षक स्वर्गीय, युसूफ सायकलवी व गांधी जयंती निमित्त दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८ वाजता एका (मुशायरा) कवी संमेलनाचे आयोजन डायमंड डिजिटल हबचे मालक शाहिस्ता हैदर सह अल्कवी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अय्युब खान सर, अबुजर शेख यांनी आयोजित केला आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
या कवीसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून रावेर-यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी व उद्घाटक सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी हारुन शेठ हे रहातील.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी शऊर आशना करणार असून, या कवी संमेलनात रागीब ब्यावली, हबीब मंजर, इमरान फारस, प्रियंका सोनी पर्यत, नौशाद ब्यावली, शाहिद मना-फट, असलम तनवीर, साबीर मुस्तफा आबादी, रईस फैजपुरी, चांदनी जोहरी, शफिक रहमानी, बाशीद उमर, ऐैफाज जाहीद इत्यादी सुप्रसिद्ध कवी उपस्थित राहणार आहेत.
या कवीसंमेलनात बी. के. सैय्यद सर, फरीद शेख, अर्षद पठाण सर, शेख जावेद सर, सलाउद्दीन जाहिद, युसूफ शाह, अब्दुल रऊफ खान यांचे सन्मानित केले जाणार आहे. अशी माहिती सदर कवी संमेलनाचे कन्व्हेनर शाहिस्ता हैदर यांनी दिली. तसेच या कार्यक्रमात चाहत्यांनी मोठ्या संख्येने यावे असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.
إرسال تعليق