Khandesh Darpan 24x7

संपूर्ण जीवसृष्टीसाठी शेवाळ ही वनस्पती अतिशय महत्वाची: डॉ.एस.ए.पाटील




 प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे वनस्पतीशास्त्र विभागामार्फत दिनांक 12 ऑक्टोंबर हा 'जागतिक शेवाळ दिवस' साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. एस. ए. पाटील, ऐनपुर महाविद्यालय हे  बोलत होते.




प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. आय. पाटील उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी 'मानव जातीच्या कल्याणासाठी शेवाळ ची उपयोगिता' या विषयावर बोलतांना शेतीसाठी, जैविक खतांसाठी, पिकांच्या वाढीवर, औद्योगिक, रासायनिक, औषध निर्मितीसाठी शेवाळ उपयोगी आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे पर्यावरणातील प्राणवायू निर्मितीत 60% पेक्षा जास्त वाटा शेवाळ या वनस्पतीचा आहे म्हणून मानव जीवनासाठीच काय पण संपूर्ण जीवसृष्टीच्या रक्षणासाठी शेवाळ हे अतिशय महत्वाचे व उपयोगी वनस्पती आहे असे सांगितले. 


प्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे व प्रमुख वक्ते डॉ. एस. ए. पाटील यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे  उद्घाटन करण्यात आले. 



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



रांगोळी स्पर्धेत भावना पाटील प्रथम, नेहा पाटील द्वितीय, प्रियांका पाटील तृतीय व उत्तजनार्थ गायत्री कापडे यांनी क्रमांक पटकावला. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देवून सन्मानित करण्यात आले. 




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आय.भंगाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. डी. आर. तायडे यांनी केले, प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. शिवाजी मगर यांनी तर सूत्र संचालन प्रा. प्राजक्ता कुरकुरे यांनी व आभार प्रदर्शन डॉ. सरला तडवी यांनी केले.



कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी डॉ. जयश्री पाटील, प्रा. मंदार बामनोदकर, प्रा. चेतना तळेले, प्रा. अदिती ढाके,  संतोष तायडे, रमेश जोगी, सौरभ नेमाडे व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post