प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा ता. रावेर येथील नगरपरिषदेने सावदा ग्रामीण रूग्णालयास "राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय" असे नांव देणेत यावे अशा आशयाची ठराव पारीत केलेला आहे. रूग्णालयास नगरपरिषदेने जागा हस्तांतरण करतेवेळी सदरील ठरावात "राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय" देणेबाबतचा स्पष्ट उल्लेख करून ठराव पारीत केलेला आहे. दि. २८/१२/२०२२ रोजी मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकिय रूग्णालय जळगांव कार्यालयाकडे नांव देणेबाबत विनंती करणेत आलेली होती. त्या पत्रावर सावदा नगरपरिषदेने स्वंयस्पष्ट अहवाल सुध्दा दिलेला आहे. तरी सुध्दा आजपावेतो रूग्णालयास नांव देणे संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
तरी आठ दिवसाच्या आंत आपण योग्य ती कार्यवाही न केल्यास दि. ०७/११/२०२३ पासून सावदा ग्रामीण रूग्णालयासमोर आमरण उपोषण करणेत येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यालयाची असेल असे पत्र आज मा. नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकिय रूग्णालय जळगांव यांना दिले.
तसेच या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव, उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग फैजपूर, तहसिलदार रावेर, सहाय्यक पोलिस निरिक्षक, सावदा पोलिस स्टेशन यांचे कडे सादर केलेली आहे.
إرسال تعليق