Khandesh Darpan 24x7

रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे कर्मचारी राजेंद्र शेनपडू कोळी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारचे महामहीम राज्यपाल रमेश बैस साहेब यांच्या हस्ते प्रदान.


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 




जळगाव येथील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स नयनतारा अँड सन्स चे कर्मचारी व श्री गुरुदत्त बहुउद्देशीय संस्था, कांचन नगर, जळगावचे अध्यक्ष, राजेंद्र शेनपडू कोळी यांना कामगार मंत्रालयाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत सण २०२१-२०२२ चा राज्यस्तरीय गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ३० ऑक्टोबर २०२३ रोजी गिरणा कामगार क्रीडा भवन प्रभादेवी मुंबई येथे महामहीम राज्यपाल रमेश बैस साहेब यांच्या हस्ते व कामगार मंत्री मा. नामदार डॉ. सुरेश खाडे साहेब मा. नामदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसकर साहेब, कामगार सचिव मा. विनिता वैद्य सिंगल, कल्याण आयुक्त रविराज इळवे साहेब यांच्या उपस्थितीत गुणवंत कामगार पुरस्कार राजेंद्र कोळी यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सोबत ज्ञानेश्वर कोळी, सोपान कापसे, शशिकांत भालेराव, ज्ञानेश्वर कोळी हे स्टेजवर उपस्थित होते 


सदरहू पुरस्कार हा राज्यस्तरीय असून या पुरस्काराचे स्वरूप रुपये २५००० चा धनादेश मानपत्र स्मृतीचिन्ह, पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले. राजेंद्र कोळी यांनी कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी जनश्री विमा, आम आदमी विमा, ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, व्यवसायिक व शैक्षणिक प्रशिक्षण उपक्रम, शिष्यवृत्ती, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, कामगार व निराधार महिलांसाठी योजनांचे मार्गदर्शन करणे त्यांना लाभ मिळवून देणे, कोरोना काळात यौद्धा म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.



इत्यादी उपक्रम राजेंद्र कोळी यांनी राबविलेले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र कोळी यांचे अभिनंदन आमदार सुरेश मामा भोळे, आ. शिरीष दादा चौधरी, डॉ. उल्हासदादा पाटील माजी खासदार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स चे  संचालक तारादेवी बाफना, सुशील कुमार बाफना, सिद्धार्थ बाफना, सुनील बाफना, व्यवस्थापक प्रकाशचंदजी जैन, नथमलजी बाफना, मनोहर पाटील, महेश पाटील, लेखाधिकारी दिपक संचेती, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी, केंद्र कामगार कल्याण केंद्र उपसंचालिका पुष्पलता जगताप, जॉब सर्च ग्रुपचे संचालक दिनेश सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post