प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
नोकरी किंवा खाजगी कामानिमीत्त पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड यासह विविध भागात गेलेले धनाजी नाना महाविद्यालयातील हिंदी विभागाचे २० वषापुर्वीचे मित्र मैत्रीण एकमेकांना भेटले. जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव सांगितले. निमित्त होते पाडवा पाहटे चे या निमित्ताने माजी विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ए. आय. भंगाळे होते.
याप्रसंगी विचार मंचावर प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड (भडगाव), डॉ. कल्पना पाटील (हिंदी विभाग प्रमुख), डॉ. ईश्वर ठाकूर, सौ. श्रद्धा गायकवाड, डॉ. राजेंद्र तायडे उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. ईश्वर ठाकूर यांनी केली. सुत्रसंचलन प्रा. सुनिता चौधरी व प्रा. वर्षा बेंडाळे यांनी केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जुन्या आठवणींना उजाळा आपल्या मनोगत विद्यार्थ्यांनी दिला महाविद्यालयातील सर्व शिक्षकांबद्दल समाधान व्यक्त केले. आज विविध क्षेत्रात जे यश संपादन केले आहे. त्याचे सर्वस्वी श्रेय आपल्या शिक्षकांना त्यांनी दिले प्रा. राजेंद्र तायडे यांनी सहलीच्या आठवणी ताज्या केल्या. व त्यांनी केलेल्या संशोधन कसे समाज उपयोगी आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. गजानन वानखेडे (हिंदी विभाग प्रमुख) बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट यांनी आपल्या मनोगतात सुरुवातीला लोकनेते स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांना विनम्र अभिवादन केले. व आपल्या ऐतिहासिक भूमीला वंदन करून आपल्या मनोगताची सुरुवात केली. यामध्ये हिंदी साहित्यामध्ये कशाप्रकारे मानवतेचे जतन होते. व समाजाच्या उन्नतीसाठी आपण सदैव तयार राहून कार्य करावे असे सांगितले. त्यानंतर प्राचार्य डॉ. एन. एन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व मनोगतामध्ये आपल्या जुन्या आठवणींना अंकुरित केले व विद्यार्थी हेच माझे खरी संपत्ती आहे. असे मत व्यक्त केले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
यानंतर हिंदी विभाग प्रमुख डॉ. कल्पना पाटील यांनी हिंदी विभाग कशाप्रकारे महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपले सहभागीता नोंदवत आहे याबद्दल चढता आलेख प्रस्तुत केला यानंतर प्राचार्य प्रा. डॉ. ए. वाय. भंगाळे यांनी आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक माजी विद्यार्थी वाढवत आहेत तसेच आपल्या महाविद्यालयातील संशोधन हे इतर ठिकाणी आपण प्रचारित- प्रसारित करावे असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन चौधरी यांनी केले. आभार डॉ. जी. एस. वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुलाब वाघोदे, चिंतामण भोई, शेखर महाजन, देवीदास तायडे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment