Khandesh Darpan 24x7

लक्ष्मीपूजन बरोबर केरसुणी आणि मिठाचीही पूजा का केली जाते?

लक्ष्मी पूजेसाठी आजच केरसुणी आणि खडे मिठाची खरेदी करून ठेवा, तत्पूर्वी त्या पूजेचे महत्त्व जाणून घ्या.




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


१२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्रमंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्कीपुराणानुसार अलक्ष्मी कलीराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी मृत्यूची, अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मच्छर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनिती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. 


कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात. पदमपुराणात अलक्ष्मीची कथा आहे, तर श्रीसुक्तातही अलक्ष्मी नाश्याम्यहं, म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव, तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. याच झाडूच्या सहाय्याने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते, अशी त्यामागची भावना आहे.





झाडू ची पूजा कशी करावी ?


१) लक्ष्मी पूजेच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे.

२) लक्ष्मी पूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळद, कुंकू लावून पूजा करतात.

३) पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडूने घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात.



झाडूचे महत्व लक्षात घेऊन पुढील गोष्टी टाळाव्या.


१) झाडूला पाय लावू नये, चुकून लागला तर लगेच नमस्कार करावा.

२) झाडूने कोणालाही मारू नये, लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांनाही नाही.

३) कोणी घराबाहेर पडले की लगेच झाडलोट करू नये, असे शास्त्र सांगते.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



मिठाची पूजा का ?


मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. तोही समुद्रमंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य आळणी होईल. मीठ ही निसर्गाने दिलेली भेट आहे. तिच्यावर कर आकारायला ब्रिटिशांनी सुरुवात केली, तेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याच मिठाचे महत्व उद्योजक ताटा यांनीही ओळखले आणि देशाचे मीठ म्हणत घरोघरी पोहोचवले. खाल्ल्या मिठाला जागणे, हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. चुकून जरी हे मीठ जमिनीवर सांडले, तर त्याचे मोल कळावे, म्हणून आई-वडील मुलांना धाक दाखवतात, की मीठ सांडू नये, नाहीतर ते पापण्यांनी भरावे लागते. यामागे मिठाचे महत्त्व समजावून सांगणे, एवढाच उद्देश आहे. म्हणून लक्ष्मीपूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी.


पूर्वी आणि आजही गावात दारोदारी खडे मीठ आणि केरसुणी विकणारा विक्रेता लक्ष्मीपूजेच्या दिवशी सकाळी यायचा. लोकही श्रद्धेने मीठ आणि केरसुणीची खरेदी करून त्याला मान देत असत. आपणही आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी केरसुणी आणि मिठाची पूजा करूया.



लक्ष्मी पूजेचे महत्व -


समृद्धी आणि ऐश्वर्या यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वास्तिक यांच्यावर श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आणि आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गुळ, चाळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात. लक्ष्मी पूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून "चोपडा पूजन" करतात तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात.

Lokmat bhakti November 10, 2023 04:04pm 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post