प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
चिनावल ता. रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते, भाजप चे निष्टावंत कार्यकर्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सीताराम सरोदे यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या उत्तर कार्याचे निमित्ताने स्व. श्रीकांत दादा सरोदे फौंडेशन व मित्र परिवाराने घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत विक्रमी १०४ रक्त दात्यांनी रक्तदान केले.
स्व. श्रीकांत सरोदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या स्मृती निमित्ताने त्यांच्या उत्तर कार्य दिनी स्व. श्रीकांत दादा सरोदे फाऊंडेशन व गावातील तरुण, मित्र परिवाराने या समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
प्रारंभी कै. श्रीकांत सरोदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माधवराव गोळवलकर स्वंयमसेवी रक्तकेंद्र जळगाव तर्फ रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात विक्रमी १०४ जणांनी रक्तदान करुन कै. श्रीकांत सरोदे यांना आंदराजली वाहिली. विशेष म्हणजे कै. श्रीकांत सरोदे यांची मुलगी कु. धनश्री, मुलगा चि.मोहित यांनीही स्वतः रक्तदान केले.
या वेळी अतिशय भावनीक वातावरणात संपूर्ण सरोदे कुंटुबीयांनी तरूण कार्यकर्ते व मित्र परिवाराला धन्यवाद दिले तर स्व. श्रीकांत दादा सरोदे फौंडेशन व मित्र परिवार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिश्रम घेतले.
स्व. श्रीकांत सरोदे - एक निर्भीड व्यक्तिमत्व :
विद्यार्थी जीवना पासून निर्भय पणे सामाजिक, राजकीय कार्यात हिरारीने भाग घेणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर आपली राजकीय कारकीर्द सुरु करणारे व जनसामान्यांसाठी अर्ध्या रात्री धावून येणारे चिनावल येथील निर्भीड व्यक्तीमत्वाचे धनी असलेले श्रीकांत सरोदे यांना दि. ९ नोहेंबर रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी अचानक देवाज्ञा झाली. यामुळे चिनावलच नव्हे तर संपूर्ण परिसरात शोक लहर पसरली.
केवळ चिनावल नव्हे तर रावेर, यावल व जिल्हाभरात १९९१ पासूनच श्रीकांत सरोदे हे नाव भाजपा चा कट्टर व निडर कार्यकर्ता म्हणून ओळखले जावू लागले कुठेही पक्षाचे आदोलन, मोर्चे वा निवडणूका मध्ये अग्रभागी असणारे श्रीकांत सरोदे यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर कार्य तर केलेच मात्र समाजात कोठेही होणार्या अन्याय, अत्याचार, आया बहिणींवर वाकड्या नजरेने बघणार्यांवर वचक ईतकेच नव्हे तर अर्ध्या रात्री वैद्यकीय कामी कोणासाठीही तत्पर असलेल्या श्रीकांत सरोदे यांचे अचानक जाणे न पटणारे आहे.
तरुणांच्या नेहमी घोळक्यात, युवा प्रिय व विद्यार्थ्यांसाठी तारणहार असलेल्या सरोदेनी गावातही अनेक विकासात्मक कामे केली. श्रीकांत सरोदे यांच्या अर्धांगिनी तनुजा सरोदे ह्या चिनावल-खिरोदा गटाच्या जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक कामे त्यांच्या हातून झाली. कधीच सत्तेचा गर्व केला नाही. दादांजवळ नेहमी समस्या घेवून येणार्याची नेहमीच गर्दी असायची.
पोलिस ठाण्यात, कोर्टात, दवाखान्यात, वा शेतकर्यांच्या समस्या असोत नेहमी आदोलंनाचे नेतृत्व करण्याची धमक असलेले व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही. मित्र मंडळींचा मोठा गोतावळा, नातेसबंधात प्रतिष्ठा मिळवणारा व कुंटुबासाठी सर्वस्व असलेल्या दादानी गावातील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विविध कार्यकारी संस्थेचे संचालक, लेवा पंचायत चे सदस्य अशी कामे केली.
दादांच्या अर्धांगिनी तनुजा सरोदे व त्याची १ मुलगा १ मुलगी, आई, २ भाऊ असा परिवार अगदी स्वकष्टाने आपला चरितार्थ चालवतात. एवढ्या मोठ्या व्यक्तीने पैशाला नव्हे तर समाजाला आपले मानत समाजकार्य शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहिले. दादांची अचानक एक्झिट अनेकांना पोरकी करुन गेली. त्यांच्या उत्तर कार्य दिनी चिनावल येथील युवकांनी स्वयमस्फूर्ती ने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. श्रीकांत दादा हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कडून मिळालेल्या प्रेरणा संपूर्ण परिसर व मित्र मंडळीना स्फूर्तिदायक राहिल.
अश्या निर्भीड व्यक्तीमत्वाला हा अखेरचा दंडवत जरी असला तरी ते चिनावल व परिसरातील नागरिकांच्या मनामनात सतत अजरामर राहतील. श्रीकांत दादा च्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शब्दांकन - दिलिप भारंबे, चिनावल.
Post a Comment