Khandesh Darpan 24x7

उपकेंद्र- कुंभारखेडा येथे डेंग्यू प्रतिबंधासाठी कंटेनर सर्वेक्षणावर सर्वाधिक भर


 प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


कुंभारखेडा येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दरवर्षीप्रमाणे डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा होत आहे. त्यात जनतेमध्ये डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करणे, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येतो.



यात डेंग्यू तापाची लक्षणे, उपचार व प्रतिरोधाच्या उपचारांची माहिती देण्यात येते. परिसर स्वच्छता, पाण्यात गप्पी मासे सोडणे, शौचालयांच्या व्हेंट पाइपला जाळी लावणे, आठवड्यातुन एक कोरडा दिवस पाळणे, पाण्याच्या टाकीवर झाकणे लावणे, खड्डयांमध्ये तुंबलेले पाणी वाहते करणे, हात स्वच्छ पाण्याने धुणे, डासोत्पत्ती स्थान शोधणे अशा उपाययोजना सुचवल्या जात आहेत. 



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



डेंग्यूची बहुतांश प्रकरणे पावसाळ्याच्या सुरूवातीला होतात. याच काळात सर्वाधिक सावधगिरी बाळगावी अशी माहिती देण्यात येत आहे. आरोग्य सेवक- मोहन अर्जुन नेरकर, आशावर्कर - जयश्री हर्षल बोंडे प्रयत्न करीत आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशालीताई विलास ताठे यांचे अनमोल सहकार्य लाभले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post