(सुट्यांमध्ये गावाकडे आलेल्या गुरूंचा हरवलेला रु. २२,००० हजार किमतीचा मोबाईल १८ तासात दिला शोधून ..!)
प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
हिंदू संस्कृती मध्ये गुरू शिष्य नात्यांना आगळीवेगळी ओळख आहे. जन्मदात्या आई च्या नंतर जर कुणाला मान मिळत असेल तर तो गुरू ला. आणि अश्या गुरूंचे उपकराचे पांग फेडणे हे सहज शक्य होत नाही. फारच नशीबवान व्यक्ती असतात की त्यांना गुरूंची अशा प्रकारची सेवा करण्याचे भाग्य लाभते. अशीच घटना फैजपूर परिसरात घडली त्याचा हा वृत्तांत....
मूळ सावदा येथील रहिवासी आणि सध्या कळवण (नाशिक) येथे विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले महेश पंडित कोष्टी हे दिवाळी सणानिमित्त गावाकडे दि. १५ रोजी आले होते. दिवाळी सुट्या संपत आल्याकारणाने दि. २० रोजी कोष्टी सर कळवण ला जात असताना आमोदा गावाजवळ त्यांच्या खाजगी वाहनातून त्यांचा महागडा मोबाईल पडला. खूपच शोधाशोध करून सुद्धा त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी याबाबत फैजपूर पो. स्टे. ला मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना स.पो. नि. असलेल्या त्यांचेच शिष्य निलेश वाघ यांची भेट झाली.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
बऱ्याच वर्षानंतर झालेली गुरू शिष्यांची भेट आणि गुरूंवर आलेला असा बिकट प्रसंग अश्या परिस्थिती मध्ये गुरूंचा हरवलेला मोबाईल शोधण्याचा आणि त्यांना एक आगळीवेगळी गुरुदक्षिणा देण्याचा चंग स. पो. नि. निलेश वाघ यांनी मनाशी बांधला.
आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिसर त्यांना याबाबत शोध घेतला. ज्याठिकाणी मोबाईल गहाळ झाला त्या ठिकाणापासून आजूबाजूचा परिसर पिंजून काढण्यात आला. आधुनिक तंत्राची मदत घेऊन परिसरातील सी. सी. टीव्ही कमेरे तपासण्यात आले. एका ठिकाणी या द्वारे एका व्यक्तीला तो मोबाईल सापडला असून याबाबत तो इतरांना माहिती देत आहे हे वाघ यांच्या लक्षात आले.
सदर व्यक्ती अमोदा येथील आहे हे अधिक केलेल्या तपासात दिसून आले. तपास चक्र वेगाने फिराल्यामुळे संबंधित व्यक्तीशी तत्काळ संपर्क झाला. त्या व्यक्तीला आमोदा येथील पोलीस पाटील तुषार दत्तात्रय चौधरी यांनी त्या व्यक्तिने ला सोबत घेऊन तो मोबाईल फैजपूर पो. स्टे. ला स्वतःहून आणून दिला.
मोबाईल सापडल्याबद्दल स.पो. नि वाघ यांनी आपल्या गुरूंना माहिती दिल्याने महेश कोष्टी हे कळवणला गेल्याने यांच्या अनुपस्थितीत त्याचे लहान बंधू गणेश कोष्टी हे तत्काळ फैजपूर पो. स्टे. ला हजर झाले. हरवलेला मोबाईल गुरू दक्षिणेचे स्वरूपात परत दिला. या घटनेने फैजपूर पो. स्टे. ला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले. आणि गुरू शिष्य हे नाते आज पुनः कलियुगात किती घट्ट टिकून आहे याचा प्रत्यय परिसरातील नागरिकांना आला. दिवसभरात या विषयाची चर्चा आज मोठ्या प्रमाणत परिसरात होताना दिसून आली.
Post a Comment