Khandesh Darpan 24x7

विनोद कोळी यांची खान्देश विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी पदोन्नती



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


ऐनपूर येथून जवळ असलेल्या पूनखेडा येथील रहिवाशी विनोद रामचंद्र कोळी यांची दि. १ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदावरून खान्देश विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करून पदोन्नती करण्यात आली आहे.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पूनखेडा येथील रहिवाशी विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई) यांची मागील उल्लेखनीय असे कार्य बघता राज्य पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणजी सपकाळे यांच्या सुचनेनुसार खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा यांनी दि. १ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदावरून खान्देश विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.





पत्रकार संघाचे जळगाव, धुळे, नंदुरबार खान्देश विभागात अश्या पद्धतीनेच एकनिष्ठेने कार्य करण्यासाठी संघटनेने ही जबाबदारी विनोद कोळी यांना दिली आहे. याआधी विनोद कोळी हे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख होते. त्यांच्या या निवडबाबत त्यांना संघटने कडून, मित्र मंडळी तसेच समजातील विविध घटकांमधून त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post