Khandesh Darpan 24x7

ग्रामगौरव दिवाळी अंकाचे प्रकाशन : गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या - आ.शिरीष चौधरी


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


ग्रामविकास या एकाच विषयाला धरून पूरक आणि सकारात्मकता हे संदर्भ मूल्य ठरवून कार्यरत ग्रामगौरव प्रकाशनचा ग्लोबल दिवाळी अंक वाचतांना गावाकडच्या आठवणी ताज्या होतात, असे गौरवोद्गार आ. शिरीष चौधरी यांनी काढले. पुण्यातून प्रकाशित व सद्या राज्यभर प्रत्येक गावखेड्यात वाटचाल सुरु असणाऱ्या ग्रामगौरव मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आ. चौधरी यांच्याहस्ते दिवाळी पावड्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.





ग्रामगौरव यंदा दुसऱ्या वर्षी सलग 'गावाकडच्या आठवणी' या थीमवर दीपोत्सव हा अंक वाचकांच्या हाती देत आहे. अंकाचे विमोचन खेड्याकडे चला अशी हाक देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ग्रामस्वराज्य चळवळ तंतोतंत अंमलात आणणारे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्याची कल्पना प्रकाशन मंडळाने व्यक्त केली होती. कारण या परिवाराला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. धनाजी नाना चौधरी, लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकराव चौधरी असा गांधी विचाराचा तीन पिढ्यांचा वारसा आहे. आ. शिरीष चौधरी तिसऱ्यांदा हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून सुखरूप बाहेर येत सर्वांच्या साक्षीने गावखेड्यासाठी लोकल टू ग्लोबल काम करणाऱ्या आमच्या प्रकाशनाच्या दिवाळी अंकाचे विमोचन करीत असल्याचा आनंद असल्याच्या भावना प्रकाशनाच्या संपादिका कु. धनश्री ठाकरे यांनी मांडल्या.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



प्रकाशनाच्या प्रारंभी समूह संपादक विवेक ठाकरे यांनी आ. शिरीष चौधरी तर जिल्हा समन्वयक वासुदेव नरवाडे यांनी युवा नेते धनंजय चौधरी यांचा सत्कार केला. यावेळी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, निंभोरा सरपंच सचिन महाले, माजी सरपंच डीगंबर चौधरी, पाल सरपंच कामील तडवी, चिनावल येथील लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव, जिल्हा ठिबक सिंचन व्यापारी अध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समितीचे सदस्य दीपक पाटील, चिनावलचे माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे, अ.भा. सरपंच परिषदेचे मागासवर्गीय विभागाचे राज्य समन्वयक राजीव सवर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, पत्रकार भास्कर महाले, दिलिप वैद्य सर, प्रकाश पाटील सर, हर्षल बोरोले, पिंटू पवार, गोलू गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य सतीश चौधरी, दिलशाद खान सर, दलित कवी मनोहर तायडे, दस्तगीर खाटीक, मधुकर बिऱ्हाडे, अतुल पाटील, दशरथ पवार आदी पंचायतराज व्यवस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते. 


आभार व्यवस्थापकीय संचालिका कु. भाग्यश्री ठाकरे यांनी मानले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم