Khandesh Darpan 24x7

विद्यार्थ्यांनो जिद्दीने यश मिळवा.... : प्राचार्य वाय.एल.पाटील सर यांचे प्रतिपादन...



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 



प्रतिकूल परिस्थितीचे तुणतुणं वाजत बसण्यापेक्षा हिमतीने जिद्दीने शिक्षण घेवून पुढे पुढे चालत रहा नक्कीच यश तुमच्या पदरात पडल्या शिवाय राहणार नाही. असा मौलिक उपदेश एन. जी. पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वाय. एल. पाटील सर यांनी घटनाकार संविधान निर्माते तुम्हां आम्हां समस्त भारतीयांना हक्क अधिकार न्याय समता बंधुता बहाल करणारे पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन विद्यार्थी सन्मान म्हणून प्रागतिक विचारमंच व आम्ही वर्गमित्र परिवार उदळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा उदळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदळी गावातील केळी व्यावसायिक सुधीर पाटील, प्रगतिशील शेतकरी ललित पाटील, वाय. एल. पाटील सर, गोपी सेठ, पंढरी पाटील, नितीन पाटील, डी. एम .पाटील, समाधान बाऱ्हे, श्रीमती माया देवी बाऱ्हे (माजी उपसभापती रावेर पंचायत समिती), सुमित बाऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य रमेश बाऱ्हे, जयश्री पाटील, हर्षाली चौधरी, अश्विनी बाऱ्हे, भूषण पाटील, डॉ. शिरीष बाऱ्हे, विचारमंचवर उपस्थित होते. 



प्रथमतः छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल, सफरचंद, केळी पाहुण्यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आली.



याप्रसंगी बाळू जावरे सर (भुसावळ), सेठ गोपी पाटील, वाय .एल. पाटील सर यांनी मनोगते व्यक्ती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन सर यांनी तर सूत्रसंचालन विनोद बाऱ्हे सर यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ. वैशाली पाटील, सौ. सीमा चौधरी मॅडम शिक्षिका भगिनी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post