Khandesh Darpan 24x7

फैजपूर येथे एड्स दिवस निमित्त जागृती अभियान



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे दि. ०७ डिसेंबर, २०२३ रोजी विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि ग्रामीण रुग्णालय, न्हावी यांच्या संयुक्त विद्यमाने '१ डिसेंबर जागतिक एड्स दिवस' निमित्त जागृती अभियान राबविण्यात आले.





सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील समुपदेशक मनोज चव्हाण यांनी एड्स प्रतिबंधक उपाय या विषयावर मार्गदर्शन केले तसेच एड्स व एच.आय.व्ही. या विषयी असलेले संभ्रम आणि अज्ञान या विषयावर सखोल अशी माहिती दिली, तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती पौर्णिमा चौधरी यांनी ही उपस्थिताना एच.आय.व्ही. टेस्ट करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांच्या आव्हानाला साद देत सर्व उपस्थितांपैकी अनेकांनी उस्फूर्तपणे एच.आय.व्ही. ची चाचणी करून घेतली.


एड्स प्रतिबंधक उपाय अभियान अंतर्गत जनजागृती करणारे पॉम्पलेट चे प्रदर्शन करताना मनोज चव्हाण, प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, लेफ्ट डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. डी. एल. सूर्यवंशी आणि इतर सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी




यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी ही निरोगी व स्वस्थ भारताच्या निर्मितीसाठी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि एच.आय.व्ही. सारख्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी युवकांनी सतर्क राहून योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. 




उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव यांनी उपस्थितांना 'एड्स नियंत्रण शपथ' चे सामूहिक वाचन केले. प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, लेफ्ट. डॉ. राजेंद्र राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. डी. एल. सूर्यवंशी, प्रा. अचल भोगे, प्रा. पल्लवी भंगाळे तसेच बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




सूत्र संचालन लेफ्ट. डॉ. राजेंद्र राजपूत, प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे यांनी केले व आभार डॉ. डी. एल. सूर्यवंशी यांनी मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय- न्हावी, स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post