प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सातपुडा विकास मंडळ संचालित, कृषी विज्ञान केंद्र, पाल आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण युवकांसाठी कौशल्यावर आधारित ‘रोपवाटिका व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 10 ते 16 डिसेंबर 2023 दरम्यान कृषि विज्ञान केंद्र, पाल येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षणात 24 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाला अजित पाटील सचिव सातपुडा विकास मंडळ पाल, चेतन मधुकर पाटील- प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, पाल उपस्थित होते.
या प्रशिक्षणा दरम्यान रोपवाटिकेची ओळख, अभिवृद्धीच्या पद्धती, रोपवाटिकेतील पोषण व्यवस्थापन, रोपवाटिकेचे पीक संरक्षण, रोपवाटिकेतील व्यवस्थापन पद्धती, रोपवाटिकेत कलमा रोपांची निर्मिती, रोपवाटिकेचे अर्थशास्त्र, शासकीय योजना, तसेच प्रात्यक्षिके आणि यशस्वी रोपवाटिका उद्योजक यांचे मार्गदर्शन व शैक्षणिक सहल चे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी महेश महाजन, (प्रमुख- कृषी विज्ञान केंद्र, पाल) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना आत्मनिर्भर व्हावे व उत्तम आणि गुणवत्तापूर्ण कलमे, रोपे, बियाणे यांचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा आणि शुभेच्छा दिल्या.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ. धिरज नेहेते यांनी काम पाहिले तसेच महेश महाजन प्रमुख- कृषी विज्ञान केंद्र, पाल, अतुल पाटील, शास्त्रज्ञ- कृषी विज्ञान केंद्र, पाल, विशाल घोलाणे संचालक- विशाल नर्सरी, चिनावल यांनी मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. कुंदन चौधरी, मयूर नारखेडे, रहेमान तडवी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment