रावेर येथे बुधवारी (ता.२७) दत्त जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी खासदार खडसे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
नियोजित तळोदा -बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहरातून व तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल, याबाबतचे प्राथमिक आश्वासन आपल्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असून, त्यासाठी ‘न्हाई’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जळगाव येथे 5 जानेवारीला होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
रावेर येथे बुधवारी (ता.२७) दत्त जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी खासदार खडसे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
गेल्या पंधरा दिवसांपासून हा नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहराऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याबाबतचे भूसंपादनाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र विविध प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. याबाबत खासदार खडसे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले, की हा महामार्ग रावेर तालुक्यासाठी ही तितकाच महत्त्वाचा आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातून एक महामार्ग आधीच जात असल्याने हा नियोजित महामार्ग रावेर तालुक्यातून जाणे व त्यामुळे रावेर तालुक्याचा विकास होणे खासदार म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. २०१४ नंतर आपण यासाठी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाबाबतचे पाठविलेले पत्र हे अंतिम नाही. ‘न्हाई’ च्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे प्राथमिक पत्र मला दाखविल्यानंतर मी तातडीने हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्यास विरोध केला आहे.
गडकरी यांना विनंती करून व निवेदन देऊन आपण नागपूर आणि भोपाळ येथील ‘न्हाई’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, आगामी बैठकीत हा राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातूनच नेण्याचा निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातून जाणे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रावेर शहराचा यापूर्वी म्हणावा तसा विकास झालेला नाही.
या राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने का असेना पण काही प्रमाणात विकास होऊ शकेल म्हणून आपला प्रयत्न रावेरसाठीच असल्याचे त्यांनी सांगितले. या राष्ट्रीय महामार्गाचे काम २०२५-२६ मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी त्याचा अंतिम डीपीआर ‘न्हाई’ चे दिल्ली येथील अधिकारी मंजूर करतील आणि कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळाचीही त्याला मंजुरी लागेल.
या सर्व बाबी होण्यास वर्ष, दीड वर्ष लागेल म्हणून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ६६ कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सुनील पाटील, राजन लासूरकर, पी. के. महाजन, सी. एस. पाटील, संदीप सावळे, शुभम पाटील, अरुण शिंदे, चेतन पाटील, उमेश महाजन, वासुदेव नरवाडे, नितीन पाटील, लखन महाजन आदी उपस्थित होते.
Sakal 28 December 2023, 9:29 am
إرسال تعليق