Khandesh Darpan 24x7

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे मैदानी स्पर्धांचे यशस्वी आयोजन



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


दि. 15 डिसेंबर, 2023 रोजी फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर व कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 



रनिंग, लांब उडी, थाळी फेक अशा विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 





या स्पर्धकांमधून स्त्री आणि पुरुष दोन्ही गटातून विभागीय स्पर्धांसाठी उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येईल. या स्पर्धांचे उद्घाटन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव  धनंजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. 



याप्रसंगी तापी परिसर विद्यामंडळ संचलित फैजपूर संस्थेचे पदाधिकारी एस. के. चौधरी, लीलाधर चौधरी, एस. एस. पाटील, ओंकार सराफ, एन. ए. भंगाळे, मिलिंद वाघुळदे, तसेच डॉ. पी. डी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, क्रीडा संचालक डॉ. जी. एस. मारतडे, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. बी. चौधरी यांनी केले तर सूत्र संचलन डॉ. सीमा बारी व आभार डॉ. जी. एस. मार्तडे यांनी मानले.






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post