Khandesh Darpan 24x7

इंटरनेटविना होईल ऑनलाइन पेमेंट! जाणून घ्या कशाप्रकारे वापरता येईल गुगल वॉलेट

भारतात 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी कमी आहे. त्यापासून वाचण्यासाठी गुगलनं वॉलेटमध्ये व्हर्च्युअल कार्ड जोडून एक नवीन पेमेंट सिस्टम सुरु केली आहे. ह्या पेमेंट सिस्टममध्ये गुगल वॉलेटवरून इंटरनेटविना देखील पेमेंट करता येईल.




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


भारतात सध्या ५जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी सादर करण्यात आली आहे, परंतु तरीही काही ठिकाणी आजही इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही. त्यामुळे गुगलची एक नवीन टेक्नॉलॉजी खूप उपयुक्त ठरू शकते. ज्यात इंटरनेटविना ऑनलाइन पेमेंट करता येईल. गुगलनं कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम सादर केली आहे. ह्यात गगूल वॉलेट व्हर्च्युअल कार्ड पेमेंटशी जोडलं जाईल. ह्या टेक्नॉलॉजी मध्ये गुगलला एकदा इंटरनेट कनेक्शन असताना कार्ड कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर इंटरनेटविना पेमेंट करता येईल. कार्ड कनेक्ट झाल्यावर तुम्ही सिंपल टॅप करून पेमेंट करू शकता.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


कशी वापरायची नवीन पेमेंट सिस्टम

कॉन्टॅक्टलेस पेमेंटमध्ये कार्ड आणि कार्डविना फोन किंवा स्मार्टवॉचनं पेमेंट करता येईल. जेव्हा तुम्ही Google वॉलेट ओपन करता तेव्हा एक डिफॉल्ट व्हर्च्युअल कार्ड दिसतं. त्या पॉईंटवर फोन कार्ड डेटा रीडर पर्यंत पोहोचतो. जेव्हा तुमचा अँड्रॉइड फोन NFC सिग्नल रीडरकडे पोहोचतो तेव्हा पेमेंट होतं.


तसेच जेव्हा तुम्ही ऑफलाइन असता तेव्हा तुमचा फोन कोणत्याही समस्येविना Google वॉलेटच्या NFC-संचारित कोडचा वापर करून पेमेंट करतो. परंतु जर तुम्ही बराच काळ ऑफलाइन राहिलात तर पेमेंट नीट होत नाहीत.


नोट - ऑफलाइन पेमेंटसाठी Google ला दर दोन दिवसांनी कमीत कमी एकदा इंटरनेटशी कनेक्ट व्हावं लागेल. ज्यामुळे तुम्ही बिनदिक्कत Google वॉलेटवरून ऑफलाइन पेमेंट करू शकाल.



UPI लाइट देखील येईल वापरता

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात यूपीआय लाइट लाँच केले. UPI लाईट हे नियमित यूपीआयपेक्षा थोडे वेगळे आहे. हे एक 'ऑन-डिव्हाइस वॉलेट' वैशिष्ट्य आहे, जे वापरकर्त्यांना यूपीआय पिन न वापरता रिअल टाइममध्ये लहान रक्कम पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. UPI Lite लहान रकमेच्या व्यवहारांसाठी तयार केले आहे. त्यामुळे याद्वारे व्यवहाराची सर्वाधिक मर्यादा ५०० रुपये आहे. NPCI वेबसाइटनुसार UPI Lite द्वारे ५०० रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी वापरकर्त्यांना यूपीआय पिनची गरज पडणार नाही. याशिवाय NPCI ने म्हटले की सुरुवातीला UPI Lite ऑफलाइन काम करेल.


महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Dec 2023, 10:00 am

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post