Bank Fraud : ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सबाबत सावध राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. अशाच एका ॲपला तात्काळ मोबाईल फोनमधून डिलीट करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अनेकदा सायबर तज्ज्ञही चक्रावून जातात. सायबर चोरांकडून सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी विविध कल्पना लढवतात. मोबाईल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून अनेकदा फसवणूक होत असल्याचे समोर आले आहेत. ऑनलाइन कर्ज (Loan App) देणाऱ्या ॲप्सबाबत सावध राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
सायबर दोस्त हँडलवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये हनीफॉल लोन ॲप हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हनीफॉल ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार लोकांनी ते डाउनलोड केले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हे ॲप तुमच्या फोनवर डाऊनलोड केले असेल तर ते त्वरित डिलीट करावे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
बँक फ्रॉडसाठी ॲप कारणीभूत?
सायबर दोस्त हे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे वेळोवेळी सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत अलर्ट देत असते. हे पोर्टल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. 'सायबर दोस्त'च्या पोस्टनुसार, हनीफॉल ॲप एका खास कोडसह डिझाइन केले गेले आहे. जेव्हा एखादा युजर फोनवर हनीफॉल डाउनलोड करतो, तेव्हा मॅलेशियल कोडच्या मदतीने हॅकर्स फोनचा ताबा घेतात. यानंतर तुमच्या फोन डेटाच्या मदतीने बँक फसवणुकीच्या घटना घडू शकतात.
Post a Comment