अयोध्येतील हा सोहळा न भूतो न भविष्यति असा राहाणार असल्याचे बोलले जात आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेची मुख्य जबाबदारी वाराणसीतील 86 वर्षीय वैदिक विद्वान पं लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित (Lakshmikant Dixit) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सर्व पुरोहिताचे प्रतिनिधीत्व करतील.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
22 जानेवारी 2024 ला राम नगरी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा नेत्रदिपक सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहतील. हा सोहळा न भूतो न भविष्यति असा राहाणार असल्याचे बोलले जात आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेची मुख्य जबाबदारी वाराणसीतील 86 वर्षीय वैदिक विद्वान पं लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित (Lakshmikant Dixit) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सर्व पुरोहिताचे प्रतिनिधीत्व करतील.
येथे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पं. दिक्षीत यांच्या पिढीचा इतिहास आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा 1674 मध्ये राज्याभिषेक झाला होता. काशीचे गागा भट्ट यांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी शिवरायांचा अभिषेक केला होता. लक्ष्मीकांत दीक्षित हे गागा भट्ट यांचे वंशज आहेत.
"आमची मुळे महाराष्ट्रातील सोलापूरजवळील जेऊर गावात आहेत. आमचे पूर्वज काशीला गेले आणि त्यांनी आपले जीवन हिंदू परंपरा आणि विधींच्या अभ्यासासाठी समर्पित केले,” असे मथुरानाथ दीक्षित म्हणाले.
16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरू होत आहे
22 जानेवारी रोजी दुपारी 12:00 ते 12:45 या वेळेत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून रामभक्तांना रामलालांचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगितले. 22 जानेवारीला होणारा कार्यक्रम हा मुख्य कार्यक्रम असेल, त्यापूर्वी 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधानांच्या पूजेनंतरच निमंत्रित पाहुण्यांना रामललाचे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मालकांनाही आमंत्रित केले जाईल
ते म्हणाले की, मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी रामजन्मभूमी संकुलात 3 तासांपेक्षा जास्त वेळ बसावे लागेल. त्यामुळे वयस्कर पाहुण्यांनी प्राणप्रतिष्ठेनंतरच दर्शनासाठी यावे असो संस्थानाच्या आयोजकांनी म्हंटले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मृत कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रे पाठवली जातील. एवढेच नाही तर 100 हून अधिक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मालकांनाही प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे.
TV9 Marathi Updated on: Dec 08, 2023 | 8:29 AM
Post a Comment