Khandesh Darpan 24x7

LokSabha Election: विजयासाठी ‘पंचसूत्र’, महाराष्ट्रातील तीन मतदार संघावर विशेष लक्ष; भाजपचं लोकसभेसाठी कसं आहे नियोजन?

बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महासचिव, राष्ट्रीय पदाधिकारी व राज्यांचे प्रभारी सामील झाले आहे. जवळपास १६० मतदारसंघांचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला.



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   

आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंचसूत्रांचा उपयोग करावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. शुक्रवारपासून सुरू झालेल्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘युवक, शेतकरी, महिला व गरिबांपर्यंत योजना पोहचवा, विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला सकारात्मक उत्तर द्या, युवकांना अधिकाधिक संपर्क साधा, डिजिटल व सोशल मीडियाचा आक्रमकपणे उपयोग करा.’



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



पराभूत मतदारसंघांचा आढावा-

बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महासचिव, राष्ट्रीय पदाधिकारी व राज्यांचे प्रभारी सामील झाले आहे. जवळपास १६० मतदारसंघांचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले परंतु १६० पराभूत झाले होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांसह प्रामुख्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला फारसे यश मिळू शकले नव्हते.

पराभूत मतदारसंघांमध्ये राज्यातील बारामती, सातारा व चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, सातारामध्ये श्रीनिवास पाटील तर चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर विजयी झाले होते. यात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या मतदारसंघांमध्ये का पराभव झाला, याची मीमांसा मतदारसंघाच्या निरीक्षकांतर्फे केली जात आहे. पराभूत मतदारसंघांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला.



‘मिशन ३५० साठी काम करा’: अमित शहा

आगामी लोकसभा निवडणूक आगळीवेगळी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जागतिक स्तरावर मोहोर उमटविली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ३५० पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा : 23 December 2023, 7:28 pm 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم