निंभोरा प्रतिनिधी
येथील श्री रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. डि. आर. चौधरी विद्यालयात वार्षिक बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतुने शाळेमार्फत वर्षभरात विविध शैक्षणिक परीक्षा, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
यामाध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी खूप उपयोग होत असतो. अशा विशेष गुणसंपादन करणारे व नैपुण्य व कलागुण दाखवणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे संचालक नरेंद्र ढाके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ध्रुव चौधरी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच याप्रसंगी संस्थेचे नरेंद्र ढाके, सुधाकर भंगाळे, प्रभाकर कोळंबे, प्रमोद भोगे व मुख्याध्यापिका सायराबानो खान मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. तसेच संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव नेमाडे तसेच हेमंत नेमाडे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत मुख्याध्यापिका सायराबानो खान मॅडम यांनी यासर्व बाबींसोबत विद्यार्थ्यांनी अभ्यासात सुद्धा लक्ष केंद्रित करुन येणा-या परिक्षेत चांगल्या गुणांसह यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्रकुमार दोडके सर आणि आभार प्रदर्शन गोकुळ भोई सर यांनी केले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका हेमलता नेमाडे, तसेच चंद्रकांत देशमुख सर, उदय अवसरमल सर, सरफराज तडवी सर, गौरव नेमाडे सर, शिक्षकेतर कर्मचारी मुकुंदा फालक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
फ्री जाहिरात
Post a Comment