प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
ऐनपूर ता रावेर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय यथे मराठी विभागामार्फत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा' अंतर्गत काव्यवाचनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी भाषेची भावी स्थिती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये सर्व शाखांचा अभ्यासक्रम हा मराठी भाषेतून होणार असल्याची माहिती मिळाल्याने विद्यार्थी वर्ग आनंदात होता.
जाहिरात
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी मराठी भाषा संवर्धनाची गरज कशी आहे - हे प्राचीन संदर्भ लक्षात घेऊन ज्ञानेश्वरांपासून ते आजतागायत मराठी भाषा संवर्धनाची गरज कशी महत्त्वाची आहे हे सांगितले.
ऐनपुर येथील रहिवासी तसेच दैनिक लोकशाही वृत्तपत्राचे पत्रकार तथा काव्य लेखनाचा छंद जोपासणारे कवी - इकबाल पिंजारी यांनी त्यांच्या स्वरचित कविता विद्यार्थ्यांना याप्रसंगी वाचून दाखविल्या.
जाहिरात
'मन' ही तत्त्वज्ञानात्मक अशी कविता; तर 'प्रेम' ही मानवी जीवनविषयक त्यांनी काव्य वाचन केले. काव्य ऐकण्याचा आस्वाद उपस्थित असणाऱ्या सर्वांनी घेतला व काही वेळ सर्व विद्यार्थी भारावून गेले.
तसेच मराठी भाषेचे जतन करणे काळाची गरज आहे व ती सर्वांचीच जबाबदारी आहे असे इकबाल पिंजारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.एस.पी.उमरीवाड, प्रा. डॉ. नरेन्द्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment