प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत राष्ट्रीय सण उत्सव समिती च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, माजी प्राचार्य तथा संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. एस. एस. पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मल्यार्पण व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी छाया शिरसाळे हिने भाषण दिले त्यात सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार, महिला सबलीकरणाचे धोरण अश्या क्रांतिकारी विचारांवर प्रकाश टाकला. प्रसंगी उप. प्राचार्य डॉ. व्ही. सी. बोरोले, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख डॉ. मारोती जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले व आभार डॉ. मारोती जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शेरसिंग पाडवी, श्री. शेखर महाजन सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फ्री जाहिरात
إرسال تعليق