Khandesh Darpan 24x7

निंभोरा येथे नुकताच श्रीमद् भागवत कथा यज्ञ कीर्तनाचा समारोप


निंभोरा प्रतिनिधी


रावेर तालुक्यातील निंभोरा येथे नुकताच दि.  जानेवारी, २०२४ सोमवार रोजी श्रीमद् भागवत कथा यज्ञ कीर्तनाचा समारोप करण्यात आला. दि. ७ जानेवारी, २०२४ रविवार रोजी सायंकाळी श्रीराम मंदिरातून बोंडे परिवाराने भागवत ग्रंथ डोक्यावर घेऊन लक्ष्मी नारायणा सह श्रीराम मंदिर संस्थान च्या वतीने गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.


या दिंडीत ह. भ. प. कथावाचक जितेंद्र महाराज- सोयगाव यांच्यासोबत टाळकरी, विणाकरी,  मृदुंगाचार्य यांनी भजने म्हटली. यावेळी गेली सात दिवस ह. भ. प. दुर्गादास महाराज- खिर्डी, सुधाकर महाराज- मेहून, पुंजाजी महाराज- मलकापूर, सुभाष महाराज- भालोद, धनराज महाराज- निंभोरा, उद्धव महाराज- दहिगाव, भाऊराव महाजन सर- मुक्ताईनगर यांची कीर्तने झाली.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



सदरचा कथा कीर्तन सोहळा श्रीमती प्रियंका राजेश बोंडे यांनी आपले पती राजेश युवराज बोंडे यांच्या स्मृति पित्यर्थ व आपले सासू-सासरे सुनंदा युवराज बोंडे, युवराज रामदास बोंडे यांच्या स्मरणार्थ श्रीराम मंदिरात आयोजित केला होता. 



यावेळी भाविकांना व गावातील कथा श्रवण करणाऱ्या ग्रामस्थांना हिरामण बोंडे यांच्या प्रांगणात प्रसाद रुपी भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता बोंडे परिवार व श्रीराम मंदिर संस्थान गावातील ग्रामस्थ मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले. 



फ्री जाहिरात 


फ्री जाहिरात 




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post