Khandesh Darpan 24x7

बलवाड़ी गावात केळी पीक विमा मिळेपर्यंत सर्व पक्षीय आमदार, खासदार व मंत्री यांना गावबंदी आणि मतदानावर बहीष्कार




बलवाडी प्रतिनिधी


बलवाड़ी येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी दि ४ रोजी एकत्र येत आक्रोश समिती स्थापन केली असून व त्यात सर्वानुमते असे ठरविले आहे की जोपर्यंत पीक विम्याची सन २०२२-२३ मधील रक्कम मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्ष्याच्या नेत्यांना गावबंदी असणार आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ वर क्लिक करा.


जळगांव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात रावेर तालुक्यात सर्वाधिक केळीची लागवड होत असून येथील केळी देशात नव्हे परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यात तालुक्यातील केळी बेल्ट म्हणून तांदलवाडी, बलवाडी, खिर्डी, ऐनपूर, निंबोल, विटवा आदी भाग सर्वज्ञात आहे. असे असतांना प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२-२३ मधील रक्कम आज मुदत संपून चार महिने होऊन सुध्दा शेतकऱ्यांना मिळालेली नाही.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



प्रत्यक्ष शेतात केळी असतांना ते प्रकरण पेंडिंग फॉर अप्रुवल किंवा रिजेक्ट असें दिसते. विमा काढतांना कंपनीच्या अटी प्रमाणे केळीचे टॅगगिंग फोटो, प्रीमियम, तसेच सात बारा उताऱ्यावर त्या साली केळी असल्याची नोंद असणे आवश्यक असते तरच विमा निघू शकतो, मग तेव्हा सर्व कागदपत्रे योग्य असल्यावर आज ती प्रकरणे रद्द कशी? असा कडा सवाल अन्यायग्रस्त शेतकरी करीत आहे. 




वारंवार अर्ज देऊन, कृषी खात्याला तक्रार करून, जिल्हाधिकारी कडे मिटिंग घेऊन म्हणा का सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटून सुद्धा काहीच फायदा होत नसल्याने हे टोकाचे पाऊल ग्रामस्थांनी गुरुवारी संध्याकाळी बलवाड़ी येथे एकत्र येत उचलले आहे. शेतकरी त्रस्त असल्याने आज ही वेळ आली आहे म्हणून गावात येणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंना फलक लावणार असून जो पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पुढारी, नेते, आमदार, खासदार यांना गावबंदी असणार आहे तसेच पुढील निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येणार आहे.



सन २०२४ इंग्रजी नव वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत आपली जाहिरात खान्देश दर्पण वर *अगदी मोफत*  दाखविण्याची गॅरंटी 


फ्री जाहिरात 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم