Khandesh Darpan 24x7

सावदा नगर परिषदेतर्फ़े थकबाकीदार मालमत्ता धारकांवर धडक कारवाही



 प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 





सावदा नगर परिषदेतर्फ़े मालमत्ता धारक यांना वेळोवेळी बिले तसेच नोटीस देण्यात आलेल्या असुनही मालमत्ता धारक आपल्याकडील थकीत रकमेचा भरणा करत नसल्याने म. मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वसुली मोहीम सुरु करण्यात आलेली असुन थकबाकीदारांचे नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाही न. प. कडून सुरु करण्यात आलेली आहे. 



त्यानुषंगाने आज दि. ०८ जानेवारी, २०२४ रोजी ४ थकबाकीदार मालमत्ता धारकांची नळ जोडणी खंडीत करण्यात आलेली असुन पुढील काळात दररोज थकबाकीदारांचे नळ जोडणी खंडीत करण्यात येणार असुन व्यवसायीक मालमत्ता धारक यांची दुकाने सिल करण्यात येणार आहेत. 


तसेच जे थकबाकीदार कराचा भरणा करणार नाहीत त्यांची मालमत्ता न. प. अधिनियम १९६५ नुसार जप्त करण्यात येवून तिचा लिलाव करण्यात येणार आहे. तरी सर्व मालमत्ता धारक यांनी आपल्याकडील कराचा भरणा तात्त्काळ करुन आपल्यावर होणारी कार्यवाही टाळावी असे जाहीर आवाहन सावदा न. प. मुख्याधिकारी यांनी केलेले आहे.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


सन २०२४ इंग्रजी नव वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत आपली जाहिरात खान्देश दर्पण वर अगदी मोफत


फ्री जाहिरात 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post