Khandesh Darpan 24x7

कारसेवकचा अर्थ माहितेय का?? कुठून आला हा शब्द



 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   

अयोध्येतील भव्य राम मंदिरात उद्या म्हणजेच २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राम मंदिरासाठी प्रदीर्घ लढा देण्यात आला, आंदोलनेही झाली, यामध्ये एक शब्द सर्वांच्या तोंडात पाहायला मिळाला तो म्हणजे कारसेवक… 


अयोध्या राम मंदिरच्या उभारणी साठी कारसेवकानी मोठा लढा दिला. 1990 साली 23 जून रोजी झालेल्या संत संमेलनात पहिल्यांदा हा शब्द वापरण्यात आला होता, परंतु त्यांना कारसेवक का म्हणतात आणि कारसेवक याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.


कारसेवक कोणाला म्हणतात??


तर मित्रानो, कार सेवा शब्द संस्कृत भाषेतील आहे. यातील कार हा शब्द कर म्हणजे हात अशा अर्थाने आलेला आहे. तर सेवा, सेवक या अर्थाने आहे. जे लोक कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा कोणत्याही संस्थेसाठी नि:स्वार्थपणे किंवा पैसे न घेता धर्मादाय कार्य करतात त्यांना कारसेवक म्हणतात. 

जाहिरात 


काही जण त्याला Volunteer असा इंग्रजीतील प्रतिशब्द वापरतात. जेव्हा अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली. तेव्हापासून कारसेवक (Karsevak Meaning) हा शब्द चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे अजूनही कारसेवक हा शब्द वापरला जातो.


जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



तर शीख धर्मग्रंथात हा शब्द अनेकदा आलेला आहे. कार सेवा ही शीख धर्माचाच एक संस्कार, शिक्षण आहे. जालियनवाला बाग घटनेच्या वेळी उधम सिंह यांनी कारसेवा केली होती, असे सांगितले जाते. 


सुवर्णमंदिरही कारसेवेचा वापर करून बांधण्यात आले. त्यानंतर हा शब्द वापरला जाऊ लागला. आजही राम मंदिरावरून जेव्हा राजकीय आरोप – प्रत्यारोप होत असतात तेव्हा कारसेवेमध्ये कोण होत?? अशी चर्चा होतेच….
 

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post