बलवाड़ी प्रतिनिधी : आशीष चौधरी
बलवाड़ी येथे श्रीराम कथा व हरिनाम संकीर्तन अखंड हरिनाम सप्ताह २५ वे रौप्य महोत्सव १६ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान संपन्न झाला. या वेळेस ह. भ. प. समाधान महाराज यांनी सात दिवस कथा वाचन केले.
जाहिरात
रोज रात्री ८ ते १० वा. कीर्तनाचा आनंद ग्रामस्थानी घेतला. पहिल्या दिवशी ह.भ. प. शिवाजी महाराज बारदे गौरखेड़ा, दुस-या दिवशी ह. भ. प. मुकेश महाराज पारगावकर, तिस-या दिवशी ह. भ. प. समाधान महाराज रेंभोटा, चौथ्या दिवशी ह. भ. प. शिवभूषण शिवानंद महाराज फुके टाकड़ी सिल्लोड, पाचवा दिवशी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पाळधिकर (शंभूराजे चरित्रकार), सहाव्या दिवशी ह. भ. प. रमेश महाराज सुसरीकर, सातव्या दिवशी ह. भ. प. संतोष महाराज पलसोड़ा यांची कीर्तन सेवा केली.
जाहिरात
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
काल्याचे कीर्तन संपल्या नंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. रात्री भव्य दिंडी सोहळा गावातुन काढ़ण्यात आली. यावेळी सोहळयात भजने, गायनाच्या संगीतमय आवाजात भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, महिला, बालगोपाल यांनी पावले खेळत पूर्ण गावात रंचना आली. रात्री नऊ नंतर भारूळांचा कार्यक्रमही करण्यात आला. महिला, ग्रामस्थानी व बालगोपालांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
जाहिरात
जाहिरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment